ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 14 - जे-10 हे लढाऊ विमान उडवणारी पहिली चिनी महिला पायलट यू शू यांचा हवाई प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणादरम्यान अपघातात मृत्यू झाला आहे. चायना डेली पेपरच्या वृत्तानुसार, 30 वर्षांची यू शू वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिक दलाच्या 'ऑगस्ट फर्स्ट'च्या सदस्य होत्या. उत्तर हुबई प्रांतातल्या प्रशिक्षण अभ्यासाच्या दरम्यान लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातून यू शूचे सहकारी पायलट सुरक्षितरीत्या बचावले आहेत. शू या 2005मध्ये वायुसेनेत भरती झाल्या. दुस-या लढाऊ विमानाला धडक बसल्यानं हा अपघात झाला. त्या लढाऊ विमान चालवणा-या 16व्या चिनी महिला होत्या. चीनच्या जे-10 लढाऊ विमान उडवणा-या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी 2012मध्ये हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला होता. या कामगिरीसाठी त्यांना त्यांचे चाहते 'सोनेरी मोर' नावानंही संबोधतात. त्या खूपच सावधरीत्या पुरुष पायलटसोबत जे-10 विमान उडवत होत्या. एका रिपोर्टनुसार चीनजवळ 400 लढाऊ जे-10 विमानं आहेत. डिसेंबरमध्ये तीन विमानांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
चीनच्या पहिल्या महिला पायलटचा अपघातात मृत्यू
By admin | Published: November 14, 2016 7:03 PM