शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

CoronaVirus: रशियातून 'एक्स्पोर्ट' होतोय कोरोना; आकडेवारीनं वाढवली चीनची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 9:53 AM

CoronaVirus: चीनमध्ये कोरोना परतला; रुग्ण संख्येनं सहा आठवड्यांतला उच्चांक गाठला

बीजिंग: चीनमधून संपूर्ण जगात पोहोचलेल्या कोरोनानं अक्षरश: धुमाकूळ घातला असून यामुळे १ लाखाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. जगभरात पोहोचलेल्या कोरोनावर चीननं नियंत्रण मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये काल (रविवारी) १०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. हा सहा आठवड्यांमधला उच्चांक आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे चीनमधले सापडलेले नवे रुग्ण रशियातून आले आहेत.चीनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात अडकलेले चिनी नागरिक आता मायदेशी परतू लागले आहेत. यातील काहींना कोरोनाची बाधा झाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. काल चीनमध्ये १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याआधी (शनिवारी) ९९ नवे रुग्ण आढळून आले होते. ५ मार्च रोजी चीनमध्ये १४३ कोरोनाबाधित सापडले होते. यानंतर पहिल्यांदाच काल कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली.चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार १६० झाली असून मृतांचा आकडा ३ हजार ३४१ इतका आहे. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या परदेशांतून येणाऱ्या चिनी नागरिकांमुळे वाढत असल्याची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिली. काल परदेशातून आलेल्या ९८ जणांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. परवा हाच आकडा ९७ इतका होता, अशी माहिती आयोगानं दिली. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेगानं फैलाव होण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. चीनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ५६ जण एकट्या हेलाँगजिआंग प्रांतातले आहेत. हा भाग रशियाला लागून असून ५६ जणांपैकी ४९ जण रशियातून आल्याची समोर आलं आहे. त्यामुळे आता रशियाला लागून असलेल्या चीनच्या शहरांमधील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली असून रशियामधून येणाऱ्यांना सीमा ओलांडताच क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनrussiaरशिया