नवी दिल्ली : चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशनंतर आता उत्तराखंडच्या सीमेवरही चीनने कारवाया सुरू केल्या आहेत. उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेनजीक चीन त्याच्या हद्दीत आणखी नवी गावे वसवत आहे. लडाख, अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने अशी नवी गावे वसविण्यास सुरूवात केली आहे. या गावांमुळे भविष्यात सीमाप्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची तसेच भारताच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.उत्तराखंडला लागून असलेल्या सीेमेपासून ११ किमी दूर चीनच्या हद्दीत ही नवी गावे वसविण्यात येत आहेत. सीमाभागात एके ठिकाणी ५५ ते ५६ नवी घरे बांधली आहेत. (वृत्तसंस्था)
नवा डाव...ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तिथे होणारा विकास तसेच इतर बाबींवर लष्कराचे बारीक लक्ष असते. सीमेवर चीनच्या हद्दीत ४०० नवी गावे वसविण्याचा इरादा आहे. त्याद्वारे या सीमाभागात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा चीनचा डाव आहे. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून भारताच्या सीमेवरील शेवटच्या चौकीपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यात ६ किमी लांबीचा एक बोगदा बांधण्यात येणार आहे.
भारतीय हद्दीतील गावे ओस पडण्याचा धोकाnउत्तराखंड व चीनमध्ये ३५० किमी लांबीची सीमा आहे. भारतीय हद्दीत उत्तराखंडच्या सीमाभागातील गावांमधील लोकांचे रोजगारासाठी दुसऱ्या शहरांत किंवा राज्यांत स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही गावे ओस पडू लागली आहेत. nत्याउलट चीन आपल्या सीमाभागात नवी गावे वसवत असून, तिथे नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. nचीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये नागरिकांनी पुन्हा येऊन राहावे, त्यांना तिथे पुरेसा रोजगार मिळावा यासाठी भारतानेही प्रयत्न सुरू केले आहेत.