बीजिंग : आर्थिक मंदीला लगाम लावण्यासाठी चीनच्या संसदेने बुधवारी नवीन पंचवार्षिक योजनेला मंजुरी दिली. त्यात आर्थिक आणि सामाजिक विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यात वार्षिक ६.५ टक्के आर्थिक वृद्धीचे ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे.चीनने २०२० पर्यंत एका संपन्न समाजाची निर्मिती करण्यासाठी एक उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार २०२१ मध्ये चीनची कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)च्या १०० व्या वर्षानिमित्त सकल घरेलू उत्पादन आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न २०१० च्या स्तरापेक्षा दुप्पट करण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आले आहे.पुढील पाच वर्षांत मध्यम उच्च वृद्धी कायम ठेवणे हे पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेनुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार ९० हजार अब्ज युआन (१३,८०० अब्ज डॉलर) पार करण्याची शक्यता आहे.दरम्यान, वित्तीय संकट झेलण्याची चीनमध्ये क्षमता असल्याचे पंतप्रधान ली शियांग यांनी स्पष्ट केले. वार्षिक पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आर्थिक विकास मंदावला असला तरीही चिंता करण्याचे कारण नाही. जोपर्यंत आम्ही सुधारणा करणार आहोत, तोपर्यंत अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही.
मंदी रोखण्यासाठी चीनची नवीन पंचवार्षिक योजना
By admin | Published: March 17, 2016 1:30 AM