बिजिंग : चीनमधील सर्वात वयोवृद्ध महिला अलीमिहान सेयती यांचे 135 व्या वर्षी निधन झाले. अलीमिहान यांनी एक दोन नाही तर तीन शतके पाहिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. चीनच्या प्रसिद्धी विभागानुसार काशगर प्रांतात शुले काऊंटीच्या कोमक्सरिक टाऊनशिपमध्ये ती राहत होती. तिचा जन्म 25 जून 1886 मध्ये झाला होता.
चीनची वृत्तसंस्था शिन्हुआनुसार 2013 मध्ये ‘चाइना एसोसिएशन ऑफ गेरोंटोलॉजी अँड जेरियाट्रिक्स’ ने जारी केलेल्या यादीनुसार अलीमिहानचे नाव सर्वात वर होते. गुरुवारी तिचे निधन झाले. मृत्यूपर्यंत त्यांचे आयुष्य नेहमीसारखे होते, वेळेवर जेवणे, अंगनात सूर्यप्रकाश घेणे आदी कामे ती करत होती.
चीनमध्ये कोमस्करिक हे असे शहर आहे ज्या शहरात सर्वाधिक 90 वर्षांवरील लोक राहतात. या शहरात सरकारद्वारे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना डॉक्टर सेवा, वार्षिक शारीरिक तपासणी आणि मासिक सबसिडी आदी दिली जाते.