बीजिंग- म्यानमारच्या राखिन प्रांतातून बांगलादेशात आलेल्या 6 लाख रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी तीन टप्प्यांमध्ये आराखडा सुचवला आहे. राखिनमध्ये शस्त्रसंधी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल असे तीनने मत मांडले आहे.
आशिया युरोप मीटिंग (एएसइएम) त्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक म्यानमारमध्ये होत आहे. म्यानमार आणि बांगालादेश रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करून प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा असून राखिनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शस्त्रसंधी केल्यास तेथे शांतता प्रस्थापित होईल आणि रोहिंग्यांना परत जाण्यासाठी योग्य वातावरण तयार होईल असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी देखिल बैठकीसाठी म्यानमारमध्ये दाखल झाले आहेत.
25 ऑगस्ट रोजी दहशतवादी गटांनी पोलीसांच्या चौक्यांवर हल्ला केल्यानंतर लष्कराने फुटीरतावादी दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला चढवला आणि संपुर्ण राखिन प्रांत यामध्ये ढवळून निघाला. त्यामुळे रोहिंग्या म्यानमार सोडून बांगलादेशकडे जाऊ लागले. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने 10 सप्टेंबर रोजी एका महिन्यासाठी शस्त्रसंधी जाहीक केली त्यानंतर सरकारतर्फेही शस्त्रसंधी जाहीर केली गेली.