बीजिंग : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या साडेतीन तासांच्या भाषणाने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेसला बुधवारी सुरुवात झाली. सन २०१२ मध्ये पक्ष व सरकारची धुरा स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर करतानाच शी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत चीनला महान समाजवादी राष्ट्र बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.बीजिंगमधील हे अधिवेशन जागतिक प्रसारमाध्यमांना खुले नव्हते. एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनमध्ये पक्ष व सरकारप्रमुख म्हणून एकाच व्यक्तीकडे ठेवण्याची परंपरा आहे. शी जिनपिंग चीनचे सर्वात बलशाली नेते आहेत. त्यास अनुसरून चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी या कामकाजाच्या बातम्या व प्रसारण जगासाठी केले.मेजाच्या कडेवर दोन्ही पंजे टेकवून आणि पांढ-या चिनीमातीच्या पेल्यातील पेयाचे अधेमधे घुटके घेत शी यांनी भाषण केले. हु जिन्ताओ यांनी सन २०१२ च्या काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणाहून शी यांचे भाषण लांबीचे होते. देशभरातून आलेले प्रामुख्याने २,३०० पुरुष पक्ष प्रतिनिधी भाषण एकाग्रतेने ऐकत होते.भाषणातील महत्त्वाचे मुद्देसन २०५० पर्यंत चीनला ‘महान समाजवादी राष्ट्र’ बनविण्याचा संकल्प.राहणीमान सुधारणे हे लक्ष्य असले तरी लोकशाही, अधिक खुलेपणा, सांस्कृतिक विविधता व सुरक्षेविषयीच्या वाढत्या आकांक्षाचीही काळजी घेतली जाईल.चीन आपले दरवाजे जगासाठी बंद न करता उत्तरोत्तर अधिक खुले करेल.परकीय गुंतवणुकदारांच्या हितरक्षणासाठी सुगम्य बाजारपेठ व स्थिर कायद्यांची हमी.सन २०५० पर्यंत चीनची सैन्यदले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी जगातील प्रगत सेनादले होतील.लष्करीदृष्ट्या प्रबळ होऊ न व कितीही विकास झाला तरी चीन विस्तारवादी धोरणे स्वीकारून इतर देशांशी दादागिरीने वागणार नाही.
३२ वर्षांत महान समाजवादी राष्ट्र होण्याचा चीनचा संकल्प, शी जिनपिंग यांचे साडे तीन तास भाषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:36 AM