चीननेभारत आणि जपानसह काही देशांना लक्ष्य करत हेरगिरी करणाऱ्या फुग्यांचा एक मोठा संच आकाशात सोडला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सैन्याने अमेरिकेतील संवेदनशील संस्थांच्या वरती गराडा घालणाऱ्या चीनी फुग्यास नष्ट केले होते. दरम्यान, हे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी भारतासह आपल्या मित्र आणि सहकारी देशांना चीनी स्पाय बलूनबद्दल जागरुक व सावधान केलं आहे.
अटलांटीक महासागराच्या उंचावर शनिवारी एका चीन बलूनला एका लढाऊन विमानाच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलं. अमेरिकेचे उप विदेशमंत्री वेंडी शर्मन यांनी सोमवारी जवळपास ४० दुतावासांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने या स्पाय बलूनच्या माध्यमातून हेरगिरी करत ‘'जपान, भारत, व्हिएतनाम, तायवान व फिलीपीन्ससह काही देश आणि चीनसाठी नव्याने होत असलेल्या रणनीतसंबंधी क्षेत्रांतील सैन्य दलासाठी ताकदीची माहिती एकत्र केली आहे. हा अहवाल काही गुप्तहेर आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी द वॉशिंग्टन पोस्ट ला दिलेल्या मुलाखतीच्या आधारावर आहे.
या अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी म्हटले की, चीनची पीएलए वायूसेनेद्वारे संचलित हे पाहणी यान ५ महाद्वीपमध्ये पाहण्यात आलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे बलून्स हे चीनी बलून्सच्या संचाचा एक भाग आहे. या बलून्सला गुप्त माहिती आणि पाहणीच्या हेतुने निर्माण करण्यात आलंय. या बलून्सने इतर देशांच्या संप्रुभतांचे उल्लंघन केले आहे. दरम्यान, दै. समाचार पत्रानुसार, नुकेतच फ्लोरिडा, टेक्सास आणि गुआम या देशांत कमीत कमी ५ बलून्स आढळून आले होते. याशिवाय गेल्याच आठवड्यात एक फुगा दिसून आला होता.