बीजिंग : चीनची जनता शांतताप्रिय आहे. आक्रमकता दाखविण्याचा किंवा क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत नाही. पण, कोणालाही आमच्या क्षेत्राचे विभाजन करण्याची परवानगी देणार नाही, अशा शब्दांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) ९०व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. चीन आणि भारत यांच्यात डोकलाम भागावरून तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, आमचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास याबाबत आम्ही स्वत:चे नुकसान होऊ देणार नाही.तीन दिवसांत दुसºयांदा जिनपिंग यांनी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य केले आहे. सिक्किममधील तणावाचा येथे थेट संदर्भ नव्हता. पण, युद्धाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही लढाईसाठी तयार आहोत. युद्धासाठी आणि जिंकण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनच्या भूभागाचे विभाजन होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:37 AM