ज्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला अशा चीननं आता जगभरातील देशांना कोरोना विरोधी लस मोफत देण्याची भाषा केली आहे. चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी यंदाच्या वर्षात जगभरातील विविध देशांना कोरोना विरोधी लसीचे २०० कोटी डोस मोफत देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीत जगात सर्वात अग्रेसर देश म्हणून चीन स्वत: जागतिक पातळीवर प्रतिमा तयार करू इच्छित आहे. (China News in Hindi China pledges 200 crore vaccines globally by year end Covax WHO)
कोरोना विरोधी लसीच्या पुरवठ्यासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय फोरममध्ये चीननं यासंदर्भातील घोषणा केली आहे. या फोरमचं आयोजन चीननं डिजिटल माध्यमातून केलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार चीननं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दान किंवा निर्यात केलेल्या ७७ कोटी कोरोना लसीच्या डोसचा पण यात समावेश आहे. चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या कोरोना लसीच्या डोसेसची जागतिक पातळवीर द्विपक्षीय कराराअंतर्गतच निर्यात केली जाते.
लसीची किंमत चिंतेचा विषयकोरोना लसीच्या किमतीवरुन आतापर्यंत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डेल्टा व्हेरिअंटचा वाढता प्रभाव आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण पाहता लसीच्या किमतीवरुन बरीच चर्चा होत आहे. चीन कोरोना लसीच्या वापरासंदर्भात राजकीय फायदा घेण्याच्या मानसिकतेत आहे असा आरोप केला जात आहे. तर जपाननं देखील