बिजिंग : तैवान चीनमध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही शांततामय पद्धतीने प्रयत्न करू. मात्र, आमच्या देशाच्या विभाजनाचे प्रयत्न कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तैवानवर चीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आमचे सैन्य तैवानचे रक्षण करेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते. त्यावर चीनने ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तैवानबाबत जो बायडेन यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता.
चीनचे वर्चस्व तैवानला मान्य नाही. आम्ही स्वतंत्र देश आहोत असा तैवानचा दावा आहे.