बीजिंग, दि. 21 - सीमारेषेवर सातत्याने भारताच्या कुरापती काढत असलेल्या चीनने आता लडाखमधील झटापटीवरून उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. 15 ऑगस्टला डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या दगडफेकीसाठी भारताला जबाबदार धरले आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांविरोधात हिंसक कारवाई केली, त्यामुळे संघर्षाला तोंड फुटले, असा दावा चीवने केला आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर आले होते. चिनी सैनिकांनी या सरोवरातून भारतीय भागात घुसखोरी करण्यास प्रयत्न केला. तेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांना अटकाव केला. भारतीय सैनिकांनी रोखल्याने संतप्त झालेल्या चिनी सैनिकांनी दगडफेकही केली. त्यामुळे काही सैनिकांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. दरम्यान, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले की, "चिनी सैनिक आपल्या हद्दीत गस्त घालत असताना भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यावेळी झालेल्या दरडफेकीत काही सैनिक जखमी झाले. मात्र ही घटना समोर आल्यावर दोन्हीकडच्या आर्मी कमांडर्सनी याबाबत चर्चा केल्याचे भारताने सांगितले होते. अधिक वाचा - चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपात- भारतावर जरब बसवण्यासाठी चिनी लष्कराने तिबेटच्या अज्ञात भागात केला जोरदार युद्ध सराव- चीनचे संकट आणि भारताचे एकाकीपण भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील घुसखोरीचा डाव स्वातंत्र्यदिनी उधळून लावला होता. चिनी सैनिकांना पिटाळून लावताना झालेल्या धक्काबुक्कीत आणि दगडफेकीत दोन्हीकडील लोक जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि दगडफेकीचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडिायावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओत 50 हून अधिक सैनिक दिसत आहेत. लडाख परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक एकमेकांसमोर आले होते. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चीनने हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. चीन सैनिकांचा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मात्र, असे काही घडल्याची आपणास माहिती नाही, अशी साळसूद भूमिका चीन सरकारने घेतली होती. . भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता.
चिनच्या उलट्या बोंबा! लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीसाठी भारतालाच ठरवले जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 10:09 PM