शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चिनी चँग’इ-६ व पाकिस्तानी ‘आयक्यूब-क्यू’, पाकिस्तान काही पाठ सोडेना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:11 AM

बैलगाड्या धावत असताना बैलगाडीच्या खाली एखादं कुत्रंही त्यापाठोपाठ ऐटीत धावत असतं. आता गाडी ओढत असतात, ते बैल; पण या कुत्र्याला वाटतं, आपणच गाडी ओढतोय..!

आपल्याकडे शहरात आता फारशा बैलगाड्या दिसत नाहीत; पण खेड्यात मात्र आजही काही प्रमाणात बैलगाड्या पाहायला मिळतात. या बैलगाड्यांचं निरीक्षण केलं, तर एक गोष्ट बऱ्याचदा दिसते, ती म्हणजे या बैलगाड्या धावत असताना बैलगाडीच्या खाली एखादं कुत्रंही त्यापाठोपाठ ऐटीत धावत असतं. आता गाडी ओढत असतात, ते बैल; पण या कुत्र्याला वाटतं, आपणच गाडी ओढतोय..! ही उपमा तशी बरी नाही; पण बऱ्याच ‘सोशल’ नेटकऱ्यांनी पाकिस्तानला ही उपमा दिली आहे. 

का? - तर त्याचं झालं असं... चीननं आपल्या नव्या चांद्रमाहिमेला नुकतीच सुरुवात केली आहे. चँग’इ-६ असं या मिशनचं नाव. चंद्रावर ज्या ठिकाणी कायम अंधार असतो, चंद्राचा जो भाग पृथ्वीपासून खूप दूर आहे आणि ज्या भागाबद्दल आपल्याला अतिशय अत्यल्प माहिती आहे, त्या ठिकाणची शोध मोहीम याद्वारे केली जाणार आहे. लाँग मार्च ५ हे रॉकेट नुकतंच प्रक्षेपित करून चीननं आपल्या या मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणताही देश चंद्राच्या या भागात कुठल्याही मार्गानं पोहोचलेला नाही. यापूर्वीही चीननं चंद्राच्या या भागात आपली मोहीम राबवली होती. चंद्राचा हा भाग पृथ्वीपासून फारच दूर आहे. त्यामुळे  या भागात कायम अंधार असल्याचं जाणवतं. या भागातील माती आणि खडकांचे नमुने गोळा करून ते परत पृथ्वीवर आणले जाणार आहेत. सुमारे दोन महिने चंद्रावर राहून हा ‘प्रोब’ २५ जून रोजी परत धरतीवर येईल. यामुळे चंद्राची आणखी अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चीनही आपल्या या नव्या मोहिमेबाबत अतिशय उत्सुक आणि आशावादी आहे. हे सगळं ठीक आहे; पण यात पाकिस्तानचा संबंध येतो कुठे आणि नेटकऱ्यांनी तरी पाकिस्तानला एवढी नावं का ठेवावीत? - कारण पाकिस्ताननंही ही चांद्रमोहीम आपली असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र आणि माध्यमांनी याबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. इतकंच काय, चांद्रमोहिमेच्या या यशस्वी लाँचिंगबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही पाकिस्तानी वैज्ञानिक आणि जनतेचं अपार कौतुक केलं आहे. आमच्या शिरपेचात आम्ही आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. 

पण पाकिस्ताननं या मोहिमेत असं केलं तरी काय? त्यांच्या देशाचा आणि त्यांच्या संशोधकांचा यातला वाटा काय? - तर या मोहिमेत चीननं जे ‘प्रोब’ चंद्रावर पाठवलं, त्याच्यासोबत पाकिस्ताननंही आपला एक उपग्रह त्यासोबत पाठवला आहे. त्याला त्यांनी पाकिस्तानचं ‘मून मिशन’ असं नाव दिलं आहे. त्यामुळेच त्याचं एवढं कौतुक! या उपग्रहाचं नाव आहे ‘आयक्यूब-क्यू’! हा उपग्रह किती मोठा असावा? ‘डॉन’ या प्रमुख पाकिस्तानी वृत्तपत्राच्या माहतीनुसार हा उपग्रह एक फूट बाय एक फूटच्या एका छोट्या खोक्याइतका ‘मिनिएचर’ उपग्रह आहे. 

अर्थात त्यामुळे ना त्या उपग्रहाचं महत्त्व कमी होतं, ना शास्त्रज्ञांचं, ना त्यांच्या देशाचं... पाकिस्तानची ही पहिलीच ‘चांद्रमोहीम’ असल्यानं आणि सुरुवातीच्या टप्प्यात तरी ती यशस्वी झाल्यानं त्यांना त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे; पण सोशल मीडिया यूझर्सच्या मते ही काही एवढी मोठी गोष्ट नाही. त्यासाठी स्वत:ची इतकी पाठ थोपटून घेण्याचीही गरज नाही, असं त्यांचं मत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी नागरिकांनीही याबाबत ‘थोडं थांबा, आताच इतक्या उड्या मारू नका’, म्हणून सुनावलं आहे. भारताच्या अंतराळ प्रगतीकडे आधी बघा, त्यांच्याकडून शिका आणि मग पुढे जा, असा ‘आस्ते कदम’ चालण्याचा इशाराही आपल्याच देशाच्या राज्यकर्त्यांना आणि माध्यमांना त्यांनी दिला आहे. चीनच्या मदतीनं का होईना, पाकिस्तानही आता अंतराळात आपलं पाऊल टाकण्यासाठी खूपच उत्सुक आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपलंही घोडं चंद्रावर कसं दामटता येईल याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. २०३० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचं चीनचं लक्ष्य आहे. चीनची आताची चांद्रमाेहीम याच लक्ष्याचा एक भाग आहे. 

पाकिस्तान चीनची पाठ सोडेना! अंतराळातलं आपलं बस्तान आणखी घट्ट करण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे. चंद्राचा आतापर्यंत अज्ञात राहिलेला हा भाग आणि पृथ्वी यांच्यातील संपर्क यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या काही दिवसांत चीन आपला नवा उपग्रहही अंतराळात साेडणार आहे. त्यातही आपला सहभाग असावा, यासाठी पाकिस्तानच चीनच्या कच्छपी लागला आहे. चीन हा असा एकमेव देश आहे, जो चंद्राच्या ‘अस्पर्श’ भागात आपलं लँडर पोहोचवू शकला आहे. ‘युतू’ हा चीनचा तब्बल पाच वर्षांपासून चंद्रावर असलेला आणि सर्वाधिक काळ सुरू असलेला रोवर आहे.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान