शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

चीनच्या मानवाधिकार कार्यकर्त्याकडून 'ड्रॅगन'ची पोल-खेल, केले अतिशय गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 5:02 PM

टेंग बियाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सीसीपीने 1949 मध्ये हुकूमशाहीवादी शासनाची स्थापना केली. यानंतर कुओमिन्तांग लोकांना मारायला सुरुवात झाली. तसेच जमीनदारांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली गेली.

ठळक मुद्दे टेंग बियाओ म्हणाले, सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे. TikTok, WeChat, आदि अॅप्स गोपनीयतेला धोका - टेंग बियाओपश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक - टेंग बियाओ

नवी दिल्ली -चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ते स्कॉलर टेंग बियाओ यांनी चीनमधील कम्यूनिस्ट पक्षाची आणि जिनपिंग सरकारची पोलखोल केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की 2012मध्ये शी जिनपिंग चीनचे राष्ट्रपती झाल्यानंतर, चीनची परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. टेंग म्हणाले, शी यांनी विरोधकांवर हल्ला केला आणि किमान 300 वकीलांना ताब्यात घेतले आहे. 2012पासून हे सर्वजण जेलमध्ये आहेत. टेंग हे, "चिनी कम्युनिस्ट पार्टी : अ अॅक्सीटेंसिअल थ्रेट टू ह्यूमॅनिटी अँड द रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर" नावाच्या एका वेबिनारमध्ये बोलत होते.

टेंग बियाओ म्हणाले, "चीनमध्ये माझे अपहरण करण्यात आले, मला गायब करण्यात आले आणि माझा प्रचंड छळ करण्यात आला. शी जिनपिंग सरकारने इंटरनेट, विद्यापीठे आणि समाजावर आपले नियंत्रण मजबूत केले आहे. झिंजियांगमध्ये, 21व्या शतकात सर्वात वाईट मानवी आपत्तीचे नेतृत्व करण्यासाठी कमितकमी 20 लाख वुईगर मुसलमान आणि इतर तुर्क मुसलमानांना ताब्यात घेण्यात आले आहे."

सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे-  टेंग बियाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सीसीपीने 1949 मध्ये हुकूमशाहीवादी शासनाची स्थापना केली. यानंतर कुओमिन्तांग लोकांना मारायला सुरुवात झाली. तसेच जमीनदारांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली गेली. सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे. 

तियानमेन चौकात हजारो निदर्शकांचा नरसंहार -एलए आणि दुष्काळामुळे लाखो चिनी लोक मारले गेले. 1989 मध्ये, त्यांनी तियानमेन चौकात हजारो निदर्शकांचा नरसंहार केला. 1999 मध्ये, लाखो फालून गोंग डॉक्टरांना कारागृहात डांबण्यात आले आणि हजारोंची कत्तल करण्यात आली."

एका चिनी कवीचा किस्सा -यावेळी त्यांनी एका चिनी कवीचा किस्साही सांगितला. त्यांनी सीसीपीविरोधात केलेल्या काही लिखानामुळे त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. यानंतर त्यांना 1990 मध्ये स्विडिश पासपोर्ट मिळाला. 2015 मध्ये त्यांचे थायलंडमध्ये अपहरणही झाले होते. यानंतर ते बरेच दिवस गायब होते. नंतर त्यांना सोडण्यात आले. यानंतर त्यांना काही यूरोपीयन खासदारांसमक्ष नेण्यात आले आणि पुन्हा गायब करण्यात आले.

पश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक - टेंग यांनी सांगितले, की चीनने जगभरात एक मोठे प्रचार नेटवर्क तयार केले आहे. पश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक आहेत. हेरगिरीसाठी मदत म्हणून चीनने अनेक अॅप्सदेखील तयार केले आहेत. TikTok, WeChat, आदि अॅप्स गोपनीयतेला धोका आहेत. ते चीनला प्रचारात मदत करत आहेत. याशिवाय कन्फ्यूशिअस संस्थादेखील अॅकॅडमिक स्वातंत्र्यासाठी एक मोठे संकट बनले आहेत. या वेबिनारचे आयोजन उसाना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

टॅग्स :chinaचीनadvocateवकिलdoctorडॉक्टर