बिजिंग - चिनी कोरोना लस कितपत प्रभावी आहे, यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता चिनी अधिकारीच त्यांच्या व्हॅक्सीन फ्रॉडची पोल खोल करत आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या एका वरिष्ठ रोग नियंत्रण अधिकाऱ्याने म्हटले आहे, की देशात विकसित करण्यात आलेले कोरोनाचे डोस कमी प्रभावी आहेत. एवढेच नाही, तर चीनमधील शी जिनपिंग सरकार या लशींना अधिक प्रभावी बनविण्यावर विचार करत असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे (China Centers for Disease Control) संचालक गाओ फू (Gao Fu) यांनी म्हटले आहे, की चिनी लशीचा बचाव दर फार अधिक नाही. ते शनिवारी चेंगदू शहरात एका सेमिनारमध्ये बोलत होते. ते म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणात वेगवेगळ्या लशींचा वापर करायला हवा की नको, यावर आता चीनमध्ये गांभीर्याने विचार केला जात आहे.
"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"
विशेष म्हणजे, चीनने काही देशांना कोरोना लशीचे कोट्यवधी डोस दिले असतानाच गाओ फू (Gao Fu) यांनी हे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही, तर चीन सातत्याने पश्चिमेकडील देशांनी तयार केलेल्या लशींसंदर्भात संशय निर्माण करण्याचा प्रयत्नही करत आहे. तत्पूर्वी, ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी चिनी लस निर्माता कंपनी सिनोव्हॅकची कोरोना विरोधी लस 50.4 टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते. तेव्हाही चिनी लशीवर प्रश्न उपस्थित झाले होते.
चिनी लशीच्या तुलनेत फायझरने तयार केलेली लस 97 टक्के प्रभावी आहे. गाओ यांनी लशीच्या निर्मितीत एमआरएनए तत्रज्ञानाचाही उल्लेख केला. या तंत्राचा वापर पश्चिमेकडील देशातील लस निर्माता करतात. या उलट चिनी लस निर्माते पारंपरिक पद्धतीवरच विश्वास ठेवता. गाओ म्हणाले, आपण एमआरएनए तत्राच्या फायद्यावर विचार करायला हवा. हे डोस मानव जातीसाठी लाभदायक ठरू शकतात. आपणही हे तंत्र अवलंबायला हवे.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...