शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

चीनमधील नेत्यांना विविधता समजत नाही, दलाई लामा यांचा ड्रॅगनवर निशाणा; जिनपिंग यांच्या बाबतीत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 9:20 PM

टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्‍यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला.

टोकियो -  चिनी नेत्यांना वेगवेगळ्या संस्कृतींची विविधता समजत नाही आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा कडक सामाजिक नियंत्रणाकडे असलेला कल, हा हानीकारक ठरू शकतो, असे तिबेटमधील निर्वासित अध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर अधिकृतपणे नास्तिक कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या चीन आणि बौद्ध धर्मीय तैवान यांच्या गुंतागुंतीच्या राजकारणात गुंतण्याऐवजी ते 1959 पासून राहत असलेल्या भारतातच राहू इच्छितात, असेही दलाई लामा यांनी म्हटले आहे.

टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्‍यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला.

दलाई लामा म्हणाले, ‘‘चीनी कम्युनिस्ट नेत्यांना सांस्कृतिक विविधता समजत नाही. खरे तर, अधिक नियंत्रणामुळे लोकांचे नुकसान होईल.’’ खरे तर चीन सर्वच धर्मांवर कठोर नियंत्रण ठेवतो आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी तिबेटियन, मुस्लीम उयगुर आणि इतर अल्पसंख्यक समुदायाला निशाना बनवून सांस्कृतिक समावेश करण्याच्या दृष्टीने अभियान चलवले आहे.

दलाई लामा 2011 मध्येच राजकारणातून निवृत्त झाले आहेत. मात्र, तिबेटीयन परंपरेच्या संरक्षणाचे ते प्रबळ समर्थक आहेत.  चीनने त्यांच्यावर तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थक असल्याचा आरोप करतो. पण, दलाई लामा म्हणतात, की ते केवळ तिबेटच्या स्वायत्ततेचे आणि स्थानिक बौद्ध संस्कृतीचे संरक्षक आहेत.

काय म्हणाले चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते - दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे, की दलाई लामा यांच्याशी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. पण बीजिंग तिबेटच्या दर्जासंदर्भात चर्चा करणार नाही. वांग बुधवारी नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले, "दलाई लामांच्या बाजूने असलेल्यांनी चीनच्या विभाजनासंदर्भातील आपली भूमिका सोडायला हवी. फुटीरतावादी कारवाया थांबवायला हव्यात आणि केंद्र सरकार तथा चिनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ठोस कामे करायला हवीत."

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग