बीजिंग- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करून चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनच्या वस्तूंवर भारतात बंदी घाला, अशीही मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे.चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, भारतीयांच्या या भूमिकेची चीननं खिल्ली उडवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारतीयांच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. भारतातलं उत्पादन क्षेत्र अजूनही अविकसित आहे. त्यांच्यात आमच्याशी मुकाबला करण्याची क्षमता नाही. भारतात ती हिंमत नाही. त्यामुळेच भारत चिनी उत्पादनांवर कधीही बहिष्कार टाकू शकत नाही. ग्लोबल टाइम्समध्ये ब्लॉगमध्ये लिहिलेल्या मजकुरानंतर भारतीय लोक कमालीचे संतापले आहेत. काही तज्ज्ञांनी तर तात्काळ मेड इन चायना प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकण्याचं अपील केलं आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना चीननं खीळ घातल्यानंतर #BoycottChineseProducts हे हॅशटॅग खूप व्हायरल झालं होतं.या हॅशटॅगच्या माध्यमातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. पण एवढ्या वर्षात तुम्ही चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकू शकला नाहीत. कारण भारत स्वतः ती उत्पादनं बनवू शकत नाही. भारताला आवडो किंवा न आवडो पण आमच्या वस्तूंचा वापर करावाच लागेल. भारत हा उत्पादन क्षेत्रात अविकसित असल्यानं त्यांच्याकडे आमच्या वस्तू वापरण्याशिवाय पर्याय नाही.
आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:47 PM