शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

जिनपिंगमुळे बायडेन नाराज; जी-२०साठी पंतप्रधान ली कियांग करणार चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 11:11 AM

चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक सहकार्यासंदर्भात जी-२० महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

बीजिंग / नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-२० गटाच्या दिल्ली येथे ९ व १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान ली कियांग त्या देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने मी निराश झालो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. 

चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक सहकार्यासंदर्भात जी-२० महत्त्वाचे व्यासपीठ आहे. चीन त्याचे महत्त्व जाणत असून जी-२०मध्ये सक्रिय सहभाग घेईल. जी-२०मध्ये  परिषदेत ली कियांग हे आपल्या देशाची बाजू मांडतील, असे त्या म्हणाल्या. 

मोदी-बायडेन यांच्यात ८ सप्टेंबरला चर्चाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-२० परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी भारताकडे रवाना होतील. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यात दोन्ही नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. भारत जी-२०चा अध्यक्ष असून त्यामुळेही दिल्लीतील परिषद महत्त्वाची ठरणार आहे. भारत व व्हिएतनामला भेट देण्यास मी उत्सुक आहे, असे बायडेन यांनी सांगितले.

राजधानीत वाहतुकीवर निर्बंधनवी दिल्ली : जी-२० शिखर संमेलनासाठी सजलेल्या ल्युटन्स दिल्लीमध्ये विदेशातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून ८ ते १० सप्टेंबरच्या वीकएंडदरम्यान दिल्लीकरांना मुख्यतः मेट्रोवरच विसंबून राहावे लागणार आहे.

टुरिस्ट मेट्रो कार्डविदेशी तसेच भारतातील पर्यटकांसाठी दिल्ली मेट्रो रेल्वेने आजपासून २४ तासांच्या वैधतेच्या २०० रुपयांच्या तर तीन दिवसांच्या वैधतेच्या ५०० रुपयांच्या टुरिस्ट स्मार्ट कार्डची विक्री सुरू केली.

२०७ रेल्वेगाड्या रद्दजी२० परिषदेमुळे उत्तर रेल्वेने ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत २०७ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तसेच ३६ रेल्वेगाड्यांच्या प्रवासाचा पल्ला तात्पुरता कमी करण्यात येणार आहे. १५ गाड्या वेगळ्या टर्मिनलवर थांबविण्यात येतील. ६ रेल्वेगाड्यांच्या प्रवास मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनdelhiदिल्लीchinaचीनIndiaभारत