Chinese Rocket blast:चीनने शुक्रवारी (11 नोव्हेंबर) त्यांच्या नवीन लाँग मार्च 6A रॉकेटच्या दुसऱ्या प्रक्षेपणात युनहाई 3 पर्यावरण निरीक्षण उपग्रह अवकाशात पाठवला. पण, या चिनी उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर एका विचित्र घटना घडली. उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत पोहचला, पण अचानक रॉकेटचे ब्लास्ट झाले. रॉकेट ब्लास्ट होण्याचे कारण न समजल्यामुळे शास्त्रज्ञदेखील हैराण झाले आहेत.
लाँग मार्च 6A ने उत्तर चीनमधील पर्वतीय तैयुआन सॅटेलाइट लॉन्च सेंटर येथून संध्याकाळी 5:52 वाजता उड्डाण केले. प्रक्षेपणानंतर उपग्रहाने त्याच्या अचूक कक्षेत प्रवेश केला. SAST आणि चीनी राज्य माध्यमांनी म्हटले आहे की हा उपग्रह वातावरणीय आणि सागरी पर्यावरण सर्वेक्षण, अंतराळ पर्यावरण सर्वेक्षण, आपत्ती प्रतिबंध आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी डिझाइन केलेले होते. पण, त्याच्या ठरलेल्या कक्षेत पोहोचताच रॉकेट ब्लास्ट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून सूमारे 310 मैल ते 435 मैल (500 ते 700 किमी) उंचीवर रॉकेटचा स्फोट होऊन 50 पेक्षा जास्त तुकडे झाले. रॉकेटचा स्फोट होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रॉकेटवर कुठलीतरी मोठी वस्तू आदळल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, Yunhai 3 लाँच हे 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेले चीनचे 50 वे लॉन्च होते. एका कॅलेंडर वर्षात 55 प्रक्षेपणांचा राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी चीन वेगाने काम करत आहे.