चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकडेवारीने पुन्हा चिंता वाढवली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिनी गायिका जेन झांग हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना पॉझिटिव्ह केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर अनेकांनी चिनी गायिकेला ट्रोल केलं आहे. पण जेनने अखेर हे धक्कादायक पाऊल का उचलले ते जाणून घेऊया
चिनी गायिका जेन झांगने स्वत: सोशल मीडियावर कोरोना व्हायरसची लागण होण्याच्या आपल्या योजनेबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की, ती त्या घरात गेली जिथे कोविडची लागण झालेले लोक होते. यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसादुखी, ही कोरोनाची सामान्य लक्षणं जाणवत होती, परंतु ती एका दिवसात बरी झाली. लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी गायिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. आपल्या व्हिडिओचा विपरित परिणाम होत असताना पाहून गायिकेने सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्ट काढून टाकली आणि लोकांची माफीही मागितली.
जेन झांगने दिलेल्या माहितीनुसार, ती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संगीत कार्यक्रमाची तयारी करत आहे. डिसेंबरच्या अखेरीस होणाऱ्या संगीत कार्यक्रमात तिला कोरोना पॉझिटिव्ह व्हायचं नव्हतं म्हणून गायिकेने आधीच स्वतःला कोविड पॉझिटिव्ह केले. दरम्यान, जेन हा एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि तिचं चीनमधील संगीत क्षेत्रात मोठं नाव आहे. मात्र, सध्या तिचे चाहते जेनवर प्रचंड नाराज आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लाटे दरम्यान, लोक आता संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे. बीजिंग आणि शांघाई, सध्या ही दोन शहरे कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की लोक त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"