सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारदार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
लडाखमध्ये आज पुन्हा गलवानसारखा खूनी हल्ला करण्याचा मनसुबा चिनी सैन्याचा होता. रेजांग लाच्या उत्तरेकडील मुखपुरीमध्ये 40 ते 50 चिनी सैनिकांनी भारताच्या चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हातामध्ये धारधार सुरे, चॉपर आदी लावलेले भाले होते. यानंतर भारतीय जवानांनी हवेत गोळ्या झाडत त्यांना तेथून हुसकाऊन लावले.
फोटोंमध्ये हा प्रकार दिसत आहे. चीनचे सैनिक घातक शस्त्रे घेऊन रेजांग लाच्या उंचीवरील चौकीवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार गलवान घाटीमध्ये घडला होता. भारतीय जवानांना घेरून चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेल्या काटेरी रॉडने हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारतीय जवानांच्या प्रत्यूत्तरात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले होते.
आज भारतीय जवानांनी चीनच्या सैनिकांना हुसकावण्यासाठी गोळीबार केला. हे सैनिक केवळ 200 मीटर अंतरावर उभे होते. दुपारी चीन आणि भारताचे जवान आमनेसामने आल्याचे वृत्त आले होते.
महत्वाच्या बातम्या...
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; 'जलयुक्त शिवार' अपयशी ठरल्याचा कॅगचा ठपका
काम करताना इगो नसावा, पण शॉर्टकटही मारू नये; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
चीनची धमकी! भारताने रक्तरंजित संघर्षासाठी तयार रहावे; हद्द पार केली
कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा