चीन : कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यावर त्याचा आनंद व्यक्त करणं तसं कठीणच. पण त्यात एखादी लक्झरी कार खरेदी करण्याचा विषय असेल तर ते शब्दात सांगणं आणखीनच कठीण. पण काही लोक इतके आनंदी होतात की त्यांना त्यांच्या कंट्रोल करणंही जमत नाही. असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत झालं.
चीनमधील एका महिलेने नुकतीच एक लाल रंगाची फरारी कार खरेदी केली होती. या कारची किंमत तब्बल 4.5 कोटी रुपये आहे. कार खरेदी केल्या महिला फारच आनंदी होती. पण पुढील काही क्षणातच तिचा हा आनंद हिरावला गेला.
झालं असं की, कार खरेदी केल्यानंतर शोरुममधून बाहेर आल्यावर महिला कार चालवत होती. पण तिचा कंट्रोल न राहिल्याने तिची कार रस्त्यावरील डिव्हायडरवरुन दुसऱ्या गाड्यांना जाऊन भीडली.
या अपघातात महिलेच्या कारचं फार नुकसान झालं. इतकं की, ती कार नंतर ओळखायलाही येत नव्हती. सुदैवाने महिलेला कोणताही इजा झाली नाही.
अपघात झाला तेव्हा कारचा स्पीड कमी होता. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. पण कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातानंतर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.