काठमांडू- नेपाळच्या पर्यटन आणि नगर विमान मंत्री रवींद्र अधिकारी आणि पाच इतर लोकांना घेऊन जाणारं विमान बुधवारी कोसळलं आहे. या दुर्घटनेत सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या पूर्वेकडच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती पहिल्यांदा समजली होती. त्यानंतर ताप्लेजुंग जिल्ह्यातील डोंगरात पोलिसांना एका ठिकाणी आगीचे मोठे लोळ दिसले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठलं असून, पाहणीदरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं समोर आलं.हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत 39 वर्षीय अधिकारी यांच्याशिवाय उद्योगपती आंग त्सरिंग शेरपा आणि पंतप्रधान केपी शर्मा यांचे खासगी स्वीय सचिव युवराज दहल, पर्यटन मंत्रालयाचे दोन ऑफिसर आणि मंत्र्यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला आहे. पूर्व नेपाळमधल्या पर्वतीय भाता ताप्लेजुंग जिल्ह्यातील एका डोंगरात हे विमान अपघातग्रस्त झालं आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत नेपाळच्या पर्यटनमंत्र्यांसह 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 6:34 PM