वॉशिंग्टन : भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चर्चेत धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक समुदायाच्या दुर्दशेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतीय-अमेरिकन ख्रिश्चन समुदायाच्या संघटनेने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची प्रशंसा केली.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा फेडरेशन ऑफ इंडियन-अमेरिकन ख्रिश्चन ऑर्गनायझेशन इन नॉर्थ अमेरिका या संघटनेने व्यक्त केली आहे. भारतात मुस्लिम समुदायाशी भेदभाव आणि द्वेषभावनेतून गुन्हे वाढले आहेत, या आरोपाबाबत ट्रम्प यांनी मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, आम्ही या मुद्यावर आपसांत चर्चा केली. विशेषत: मुस्लिम समुदायाबाबत चर्चा केली. ख्रिश्चन समुदायाबाबतही चर्चा केली. पंतप्रधान मोदींकडून ठोस उत्तर मिळाले. आम्ही अनेक लोकांसोबत बराच वेळ धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर चर्चा केली.ट्रम्प यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना संघटनेचे अध्यक्ष कोशी जॉर्ज म्हणाले की, ट्रम्प आणि मोदी यांच्यातील चर्चेबाबत आम्हाला माहिती नाही; परंतु ट्रम्प यांनी द्विपक्षीय चर्चेत प्राधान्याने धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला; त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. (वृत्तसंस्था)सकारात्मक प्रतिमा...संघटनेचे चेअरमन जॉन प्रभुदास यांनी सांगितले की, भारताची सकारात्मक प्रतिमा दाखविली जात असतानाही भाजप सरकारच्या धोरणांंमुळे होत असलेला हिंसाचारही दिसत आहे. राजकीय शांतता आर्थिक प्रगतीचा आधार आहे.बहुसंख्यवाद आणि असहिष्णुतेकडे नेणाऱ्या धोरणांचा प्रचार सर्वसामान्य जनतेची समृद्धी धोक्यात येऊ शकते. प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाºया भारतीय संविधानाचा पुरस्कार करावा.
धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा; ख्रिश्चन संघटनेने केली ट्रम्प यांची प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 2:49 AM