ओहयो : जगभरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नाताळ धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र, अमेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये एका भागात सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा केला जात आहे. कारण आहे, एका मुलाला मेंदुचा कर्करोग झाल्याचे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा केवळ 2 महिनेच जिवंत राहू शकणार आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांनी तीन महिने आधीच नाताळ साजरा करण्यात सुरुवात केली. याला शेजाऱ्यांनीही प्रतिसाद देत नाताळ साजरा करत आहेत.