न्यूयॉर्क : अमेरिकेत कृष्णवर्णीयाला ठार मारणा-या आणखी एका गौरवर्णीय पोलिसाला निर्दोष सोडण्यात आले असून, त्याविरोधात न्यूयॉर्कमधील लोक रस्त्यावर उतरले आहेत. एरिक गार्नर या कृष्णवर्णीय माणसाचा पोलिसांनी पकडले असताना मृत्यू आला होता. मला श्वास घेता येत नाही असे गार्नरचे अखेरचे शब्द होते. ग्रँड ज्युरीने गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याला निर्दोष सोडल्याच्या निषेधार्थ रात्रीपासून लोक रस्त्यावर उतरले. ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर, आय कान्ट ब्रीद या नव्या घोषणा लोक देत होते. ४४ वर्षाच्या एरिक गार्नरला दम्याचा विकार होता व तो लठ्ठ होता. सिगारेट विकल्याच्या आरोपावरून त्याला अटक झाली होती. (वृत्तसंस्था) उत्तरीय तपासणीत त्याचा मृत्यु गळा दाबून झाल्याचे निदर्शनाला आले आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेत नागरिक उरतले रस्त्यावर
By admin | Published: December 06, 2014 12:17 AM