व्हेनिस : उंच लाटांसोबत बुधवारी रात्री आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांनी इटलीतील ऐतिहासिक व्हेनिस शहरात हाहाकार उडाला आहे. अनेक भाग जलमय झाले असून, ऐतिहासिक स्थळांत पाणी शिरले.पाण्याची पातळी वाढतच असल्याने पर्यटक व्हेनिस शहरातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. व्हेनिस शहरांवर जवळपास ५० वर्षांनंतर भीषण आपत्ती ओढवली असून, ही आपत्ती म्हणजे भविष्यातील जगबुडीचे सूचक असल्याचे बोलले जाते. इटली सरकार व्हेनिस शहरात आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे.
व्हेनिस शहराला पुराचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 4:29 AM