शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:42 IST

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे.

सुदानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध आता एका निर्णायक वळणावर जाऊन पोहोचले आहे. या गृहयुद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. आता, सुदानच्या लष्कराने शुक्रवारी (२१ मार्च २०२५) राजधानी खार्तूममधील राष्ट्रपती भवनावर पुन्हा कब्जा केल्याची घोषणा केली. हे सैन्य आता पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) च्या सदस्यांचा शोध घेत आहे. 

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे. येथे सुरू असलेल्या या गृहयुद्धात एकाबाजूला सुदानचे सैन्य, तर दुसऱ्याबाजूला आरएसएफ यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोघांचाही हेतू सुदानची सत्ता मिळवणे असा आहे.

राजवाड्यावर कब्जा म्हणजे सुदान लष्कराचा मोठा विजय - राजवाड्यावर पुन्हा एकदा कब्जा मिळवणे हा सुडान लष्करासाठी एक मोठा विजय आहे. कारण, युद्धाच्या सुरुवातीला अर्थात एप्रिल २०२३ मध्ये खार्तुमचा अधिकांश भाग हा आरएसएफच्या ताब्यात गेला होता. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वीच, "आम्ही राजवाड्यापासून माघार, असे समजू नका," असे, आरएसएफ नेते जनरल मोहम्मद हमदान दगालो यांनी म्हटले होते.

सुदानच्या सैनिकांनी साजरा केला विजय -दरम्यान, सुदानचे सैनिक आणि सहकारी मिलिशियांनी हळूहळू शहराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागावर कब्जा केला आणि आपल्या लक्ष्यांवर मोठा हल्ला केला. गुरुवारी सकाळच्या सुमारास लष्कराने राजवाड्याच्या दक्षिणेकडे आरएसएफच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावेळी, आरएसएफ सैनिक पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. यानंतर, शुक्रवारी (२१ मार्च २०२५) सैन्यासोबत लढणाऱ्या सुदानी मिलिशिया सैनिकांनी विजय साजरा केला.

टॅग्स :Soldierसैनिक