शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

अनिश्चित मते मिळविण्यासाठी क्लिंटन, ट्रम्प यांची शेवटची धडपड

By admin | Published: November 07, 2016 6:18 AM

जगभर उत्सुकता असलेली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असून हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जी मते निश्चित नाहीत

वॉशिंग्टन : जगभर उत्सुकता असलेली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असून हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जी मते निश्चित नाहीत त्यांना आपल्या पारड्यात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प निर्णायक ठरणाऱ्या राज्यांची मते मिळवायच्या जोरदार प्रयत्नांत आहेत. ट्रम्प यांच्यापेक्षा किंचित आघाडीवर असलेल्या क्लिंटन यांनी शेवटच्या आठवड्यात बियोन्स आणि केट पॅरी यांचे संगीत जलसे तर ट्रम्प यांनी आवोवा, मिनेसोटा, मिशिगन, पेनसिल्व्हानिया, व्हर्जिनिया, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि न्यू हॅम्पशायरमध्ये क्लिंटन यांच्यावर प्रचारात जहरी असे हल्ले केले. अगदी सधन वर्गासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी उपयोगाची अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची योजना तसेच अमेरिकेबद्दलचा दृष्टिकोन क्लिंटन जाहीर करतील, असे त्यांच्या प्रचारात म्हटले. अमेरिकेच्या १७८७ च्या घटनेत प्रगती, सर्वसमावेशकता, समता व शक्ती या अमेरिकन आदर्शांवर पेनसिल्व्हानियातील भाषणात क्लिंटन मंगळवारी भर देतील व मला अध्यक्षपदाची संधी द्या, असे आवाहन करतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा दृष्टिकोन हा कसा फूट पाडणारा व धोकादायक आहे त्यामुळे ते अध्यक्षपदासाठी व या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी कसे अपात्र आहेत हे अध्यक्ष ओबामा यांच्यासोबत क्लिंटन सांगतील, असे निवेदनात म्हटेल आहे. मतदानाच्या आकडेवारीमुळे उत्साही बनलेल्या ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचा महत्वाचा गड असलेल्या मिनेसोटात म्हटले की, मिनेसोटाला डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला समजले जात असले तरी तेथे आम्ही खूप चांगली कामगिरी करीत आहोत, कोलोरॅडोत आम्ही लक्षणीय चांगली कामगिरी करीत आहोत. संपूर्ण देशभर क्लिंटन (४४) आणि ट्रम्प (४३) यांच्यात अतिशय तीव्र लढत सुरू आहे. यात ज्या मतदारांचा कोणाला मत द्यायचे याचा व ज्यांनी आधीच मत दिले त्यांचा अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही त्यांचाही समावेश आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात अशाच मतदानात क्लिंटन या ट्रम्प यांच्यावर सहा मतांनी आघाडीवर होत्या. मतदानाची माहिती ठेवणाऱ्या रियलक्लिअरपोलिटिक्सनुसार रिपब्लिकनवर डेमोकॅ्रट्सची १.७ टक्क्यांची आघाडी आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्याबरोबरीने चालणाऱ्या क्लिंटन यांनी ताज्या एबीसी ट्रॅकिंग मतदानात पाच गुणांची आघाडी मिळवली आहे. (वृत्तसंस्था)फॉक्स न्यूज सर्व्हेमध्ये क्लिंटन ४५ तर ट्रम्प यांना ४३ टक्क्यांची आघाडी होती. २०० दशलक्ष पात्र मतदार नवा अध्यक्ष निवडतील. ४८ राज्यांतील ४० दशलक्षांपेक्षा जास्त मतदारांनी आधीच मतदान करण्याच्या सवलतीचा लाभ घेत मतदान केले. हिलरी यांची मुलगी चेल्सा हिच्या फिलाडेल्फिया पाच सभा होतील. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारासाठी जशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत तशी मंडळी ट्रम्प यांच्या बाजुने नाहीत. परंतु ते मोठ्या प्रमाणावर आपल्या कुटुंबियांवर अवलंबून आहेत. अध्यक्षीय निवडणुकीचे स्वरूप पाहता वेगवेगळ््या मतदार संघात वेगवेगळे चित्र बघायला मिळू शकते.तर कंपन्यांवर ३५ टक्के करज्या अमेरिकन कंपन्या इतर देशांतून कामे करून घेतात व आपल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवतात त्यांच्यावर ३५ टक्के कर आकारीन, असे ट्रम्प यांनी म्हटले. टम्पा, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना व विल्मिंग्टन येथील प्रचारसभेत त्यांनी ही घोषणा केली. ट्रम्प जिंकले तर मला काळजीजर्मनीचे अध्यक्ष जोकीम गाऊक यांनी ट्रम्प विजयी झाल्यास काळजी वाटेल, असे म्हटले. त्यांचा विजय हा काळजी करण्यासारखा ठरेल, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी हे सांगू शकत नाही, असे गाऊक जर्मनीच्या डेर स्पिगेल वीकलीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. (वृत्तसंस्था)ट्रम्प यांच्या विजयाचे लिचमन यांचे भाकीतडोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकतात, असा अंदाज प्रोफेसर अ‍ॅलन जे. लिचमन यांनी वर्तवला आहे व आपल्या अंदाजावर ते अजूनही चिकटून आहेत. अर्थात त्यासाठी ते १३ मुद्दे समोर मांडतात. ते म्हणतात या संभाव्य विजयाच्या मतांची संख्या ही खूपच कमी असेल. गेल्या ३२ वर्षांत त्यांचे अंदाज खरे ठरले आहेत. च्हे अंदाज खरे की खोटे असे विधान करणारे असतात. उदा. दोन महत्वाच्या उमेदवारांना तिसरा पक्ष स्पर्धक नाही किंवा स्वतंत्र प्रचार नाही. किंवा सध्याच्या सरकारवर कोणत्याही मोठ्या भानगडीचा ठपका नाही. अशा प्रश्नांपैकी सहा किंवा त्यापेक्षा जास्त उत्तरे खोटी आली तर विद्यमान सरकारचा पराभव होतो.