नवी दिल्ली : भारताला प्रत्येकवेळी संकटात टाकणाऱ्या चीनने आता पाण्याच्या रुपात आणखी एक संकट उभे केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून हे पाणी लवकरच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सोडणार असल्याचा इशारा चीनने दिला आहे. यामुळे आसाममध्ये पूर येण्याची शक्यता आहे.
चीनच्या इशाऱ्य़ानंतर आसामच्या डिब्रूगडमधील अधिकाऱ्यांना जिल्हा मुख्यालय न सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. चीनने जर नदीमध्ये पाणी सोडले तर पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे आसाममध्ये महापुराचा धोका उद्भवू शकतो. अरुणाचल प्रदेशचे खासदार निनोंग एरिंग यांनीही पुराचा इशारा दिला गेला असल्याचे सांगितले.
एका करारानुसार चीन ब्रह्मपुत्रेमध्ये पाणी सोडण्याबाबतचे इशारे मे ते ऑक्टोबर दरम्यान देतो. यामुळे तेथील राज्यांना सतर्क करता येते. मात्र, गेल्या वर्षीच्या डोकलाम वादामुळे चीनने हे इशारे देणे बंद केले होते. मात्र, यंदा पुन्हा चीनने इशारा देत भारताला सावध केले आहे.