महाशक्ती म्हणून फुशारक्या मारत शेजारी पाजारच्या सर्वच देशांना त्रास देणाऱ्या चीनला फिलिपिन्स हा छोटासा देश नडला आहे. दक्षिण समुद्रात जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लोटिंग बॅरिअर लावणाऱ्या चीनच्या दोऱ्याच फिलिपिन्सच्या कोस्ट गार्डने कापल्या आहेत.
भल्या भल्या देशांनी माघारी घेतली असती असा प्रसंग दक्षिण चीन समुद्रात घडला आहे. फिलिपिन्सच्या १२० मैल दूरवरील स्कारबोरो शोलमध्ये चीनने जहाजांची वाहतूक रोखण्यासाठी फ्लोटिंग बॅरिअर म्हणजेच जाळ्यांचे दोरखंड लावले होते. ते भविष्यातील जोखमीचा विचार न करता चीनची मुजोरी मोडून काढण्यासाठी फिलिपिन्सने कापून टाकला आहे.
फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस जूनियर यांनी आदेश दिले होते. यानुसार फिलिपिन्सच्या कोस्टगार्डने ही कारवाई केली आहे. याचा व्हिडीओ देखील त्यांनी प्रसिद्ध केला आहे. तसेच समुद्रात चीनची दादागिरी चालणार नाही असा संदेश या कारवाईतून दिला आहे.