अक्रा : दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताचा पाठिंबा जाहीर करताना मुखर्जी बोलत होते. मुखर्जी यांचे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले आहे. ते म्हणाले,‘गेल्या तीन दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरलाआहे. दहशतवाद जागतिक संकट बनल्याची घानाची भावना योग्य आहे.’ घानाचे अध्यक्ष जॉन ड्रॅमिनी महामा यांनी रविवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात मुखर्जी म्हणाले, ‘दहशतवादाला ना कोणती सीमा आहे ना कोणता विचार. विचारधारा आहे ती हेतुपुरस्सर विध्वंसाची. तुम्ही या संकटाला तोंड देत आहात. भारत त्यात तुमच्यासोबत आहे.’
दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी
By admin | Published: June 14, 2016 4:32 AM