रशिया आणि सौदी अरेबियाने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे दोन्ही देश ओपेक प्लस समूहाचे सदस्य आहेत. या देशांनी कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याच्या हेतूने जुलै 2023 मध्ये तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, कमी तेल उत्पादन करूनही रशिया आणि सौदी अरेबियाने अब्जावधी डॉलरची अतिरिक्त कमाई केली आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एक रिपोर्टमध्ये यासंदर्भात खुलासा करण्या आला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एप्रिल ते जून महिन्यादरम्यानच्या तुलनेत या तिमाहीत रशियाने तेल निर्यातीतून 2.8 अब्ज डॉलरची अधिकची कमाई केली आहे. तर या कालावधीत सौदी अरेबियाने 2.6 अब्ज डॉलर एवढी अधिकची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, या देशांच्या या अतिरिक्त कमाईचे कारण म्हणजे, तेल उत्पादनातील कपातीनंतर वाढलेल्या कच्च्या तलाच्या किंमती.
किती वाढल्या तेलाच्या किंमती - रशिया आणि सौदी अरेबियाने जुलै 2023 मध्ये तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली होती. तेव्हा कच्च्या तेलाची किंमत 76 डॉलर प्रति बॅरल होती. कच्च्या तेलाची किंमत आहेज जवळपास 93 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. रशिया आणि सौदी अरेबीयाने उत्पादनातील ही कपात या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जगावर परिणाम - कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास, संपूर्ण जगात महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारताचा विचार करता, भारत एकूण आवश्यकतेच्या 87 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. यामुळे, याचा परिणाम भारतीय तेल बाजारावरही पडेल.