(Image Credit : DailyMail)
महिलांच्या प्रेग्नन्सीबाबत किंवा बाळांच्या जन्माबाबत नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. पण स्पेनमध्ये एक तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींपेक्षाही वेगळी घटना समोर आली आहे. ३३ वर्षीय मोनिकाच्या गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या पोटात आणखी एका भ्रूण वाढत होतं. ज्या अर्भकाच्या पोटात हे भ्रूण वाढत होतं ती एक मुलगी आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ३५ आठवड्यांची गर्भवती असलेल्या मोनिकाचं डॉक्टरांनी जेव्हा अल्ट्रासाऊंड केलं तेव्हा त्यांना वाटलं की, अर्भकाच्या लिव्हरमध्ये गाठ आहे. पण नंतर जेव्हा कलर स्कॅन केलं तेव्हा समोर आलं की, त्या अर्भकाच्या आत आणखी एक भ्रूण वाढत आहे. पण दुसर बाळ व्यवस्थित विकसित होत नव्हतं. अशा स्थितीला अर्भकाच्या पोटात भ्रूण असं म्हणतात. अशी घटना ५० लाखांपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये बघायला मिळते.
डॉक्टर पारा सावेद्रा यांनी सांगितलं की, स्कॅनमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं आढळलं. मग आम्ही अल्ट्रासाऊंड केलं जेव्हा कळालं की, अर्भकाच्या पोटात भ्रूण आहे. हे पेशींचं विभाजन उशीरा होत असल्यामुळे होतं आणि एका नाळेच्या माध्यमातून आईसोबत जोडलं जातं.
पण हे भ्रूण दोन आठवड्यातच २० ते ३० टक्के वाढलं होतं. यामुळे पहिल्या अर्भकाच्या अंगांचं नुकसान होत होतं. त्यामुळे पहिल्या अर्भकाला धोका होता. अशात आम्ही पहिल्या अर्भकाला वाचवण्यासाठी कीहोल सर्जरीच्या माध्यमातून दुसरं भ्रूण काढलं. याचं वजन केवळ १४ ग्रॅम होतं. या भ्रूणाला हात-पाय तर होते पण मेंदू आणि हृदय नव्हतं. गर्भनाळ कापल्यावर त्या भ्रूणचा मृत्यू झाला. आता पहिल्या बाळाच्या जन्माला आणि सर्जरीला १ महिना झाला असून तिची स्थिती चांगली आहे.
अर्भकात भ्रूण काय असतं?
अर्भकात अर्भक ही स्थिती पेशींच्या उशीरा होणाऱ्या विभाजनामुळे होते. ज्यात जुळे अर्भकं पूर्णपणे वेगळे होत नाहीत. दोन्ही अर्भक एकाच नाळेच्या माध्यमातून आईशी जुळले जातात. तर दुसरं अर्भक त्याच्या जुळ्या अर्भकाच्या नसांशी जुळतं. अर्भकाच्या पोटात भ्रूण याप्रकारचं पहिलं प्रकरण १८०८ मध्ये ब्रिटीश मेडिकल जर्नलमधून समोर आलं होतं.