वॉशिंग्टन- पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातल्या 400हून अधिक प्रकाशनांनी चार्ल्स क्रॉथम्मर यांचे लेख छापले होते. अनेक वर्षांपासून क्रॉथम्मर यांना कर्करोगानं पछाडलं होतं.दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पोटातून कर्करोगाची गाठ काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी रक्त तपासणी केली असता कर्करोगानं पुन्हा डोकं वर काढल्याचं त्यांना समजलं. तसेच कर्करोग शरीरात वेगानं पसरत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.8 जून रोजी क्रॉथम्मर डॉक्टरांकडे नियमित तपासणीकरिता गेले असता डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून तुमच्याकडे फक्त आठवड्याभराचा वेळ असल्याचं त्यांना सांगितलं. मृत्यूपूर्वी त्यांनी एक विधानही केलं होतं. हा अंतिम निर्णय आहे. माझा लढा आता संपला आहे, असं म्हणत त्यांनी प्राण सोडले आहेत.
पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:45 AM