सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया संबंध आता ‘टी-२०’ मोडमध्ये आहेत, असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध किती वेगाने वृद्धिंगत होत आहेत, हेच दर्शवले. आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप करताना मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना आगामी क्रिकेट विश्वचषक आणि दिवाळीसाठी भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.
ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त करत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, ज्यामुळे परस्पर संबंध बिघडतील, असा इशारा दिला. यावेळी पंतप्रधान अल्बानीज यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
एका वर्षात सहावेळा भेटमोदी म्हणाले, ‘एका वर्षात अल्बानीजशी माझी ही सहावी भेट आहे. यावरून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध किती खोल आहेत हे सिद्ध होते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर दोन्ही देशांमधील संबंध टी-२० मोडमध्ये आले आहेत.’ यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक आणि दिवाळीसाठी मोदींनी अल्बानीज यांना निमंत्रित केले. यानंतर मोदींनी गव्हर्नर जनरल डेव्हिड हर्ले यांचीही भेट घेतली.