Funny Viral Video: पराष्ट्र संबंधांमध्ये राजकीय शिष्टाचार हा खूप महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोक स्वतःच्या आधी इतरांना संधी देतात, त्याचा अनेकदा शिष्टाचाराची संबंध असतो. असेच एक दृश्य मंगळवारी उत्तर कोरियाच्या (North Korea) प्योंगयांगमध्ये पाहायला मिळाले. रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) हे एकत्र आले. यावेळी त्यांना एकाच कारमधून प्रवास करायचा होता. अशा वेळी दोघांपैकी पहिले कारमध्ये कोण बसणार यावरून एक मजेशीर प्रसंग घडला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे दोन दिवसांच्या उत्तर कोरिया दौऱ्यावर आहेत. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथील सुनान आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा पुतिन पोहोचले, तेव्हा किम जोंग उन यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले. या दरम्यान दोघांमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. दोघांची विमानतळावर खूपच सौहार्दपूर्ण भेट झाली. यानंतर दोघेही कारमध्ये बसण्यासाठी एकमेकांना 'पहले आप.. पहले आप..' अशी विनंती करत होते. यावेळी थोडीशी मजेशीर परिस्थिती निर्माण झाली. पण अखेर पुतिन आधी कारमध्ये बसले आणि मग किम कारमध्ये बसले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, यानंतर किम आणि पुतिन यांचा ताफा प्योंगयांगच्या रस्त्यावर आला. पुतिन यांच्या उत्तर कोरिया दौऱ्यासाठी संपूर्ण उत्तर कोरिया सजलेला दिसला. प्रत्येक चौकात रशियन ध्वज आणि पुतीन यांचे चित्र दिसले. पुतिन आणि किम जोंग यांच्यातील ही केमिस्ट्री संपूर्ण जगासाठी एक मोठा संदेश असल्याचे आंतरराष्ट्री राजकीय जाणकारांचे मत आहे.