न्यूयॉर्क : विविध प्रकरणांत अटक केलेल्या तीन मुस्लिम महिलांना त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी जबरदस्तीने बुरखा काढायला लावणे न्यूयॉर्क पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे.पोलिसांच्या या कृतीमुळे आपल्या धार्मिक हक्कांचा भंग झाला असा दावा करत या तीन महिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्या दाव्यात अखेर न्यूयॉर्क पोलिसांना समझोता करावा लागला असून त्यानुसार या तीन महिलांना प्रत्येकी साठ हजार डॉलर याप्रमाणे एकूण १.८० लाख डॉलर एवढी भरपाई द्यावी लागली आहे.या समझोत्यावर ब्रूकलीन येथील न्यायालयात या आठवड्याच्या प्रारंभी शिक्कामोर्तब झाले असे या महिलांचे वकील तहानी अबौशी यांनी सांगितले. या तीन महिलांपैकी दोघींना २०१५ व एका महिलेस २०१२ साली ब्रूकलीन या न्यूयॉर्कच्या उपनगरात अटक करण्यात आली होती.या तीन मुस्लिम महिलांपैकी एक जण हायस्कूल विद्यार्थीनी होती. पोलिसांनी छळ केल्याची तक्रार तिने केली होती. अजून दोन महिलांना पार्किंगवरुन वाद झाल्याने अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)>नियमात बदल करणारया प्रकरणांनंतर न्यूयॉर्क पोलीस सावध झाले असून त्यांनी नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याच लिंगाच्या अधिकाºयाक़डून खासगीत छायाचित्र काढून घेण्याचा पर्याय आरोपीस दिला जाईल. तसेच त्यावेळी त्याच्या धर्मानूसार आवश्यक असल्यास त्याला शिर झाकायची परवानगीही दिली जाईल.
बुरखा काढून घेतल्याबद्दल तिघींना मिळाली भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 5:58 AM