ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 28 - तंत्रज्ञानाला मानवी जीवनाचे अविभाज्य अंग म्हणण्याऐवजी तंत्रज्ञानाने मानवी आयुष्याचा ताबा घेतलाय असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. प्रगत तंत्रज्ञान मानवी आयुष्याला वेगवेगळया प्रकारची अनुभूती देत आहे. अगदी माणसाचे लैंगिक आयुष्य त्याच्या आवडी-निवडीही तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.
आता तंत्रज्ञानामुळे पॉर्न व्हिडीओ सहज उपलब्ध होतात. त्याच जोडीला आत सेक्स टॉईज, सेक्स डॉल्स, सेक्स रोबोटसही बाजारात आले आहेत. दोन मानवी शरीरांच्या नैसर्गिक प्रणयामध्ये एक वेगळा आनंद, सुख असते. पण माणूस आता सेक्स डॉल्स आणि सेक्स रोबोटमध्ये भावनांसह गुंतू लागला आहे.
सध्या सेक्स रोबोट हॉलिडे रिसॉर्टची एक नवीन कन्सेप्ट आली आहे. जगामध्ये अनेकजण खास सेक्सची मजा करण्यासाठी बँकॉक, थायलंडला जातात. सेक्स रोबोट कन्सेप्टमध्ये काही हॉटेल्समध्ये सेक्स डॉल्स दिल्या जातात. अॅमस्टरडॅम, बँकॉक या पर्यटनस्थळांना यातून फायदा होऊ शकतो. महत्वाचं म्हणजे सेक्सची ही कृत्रिम साधन मानवी मेंदूला भुरळ घालत आहेत. चीन सारख्या देशामध्ये स्त्रीऐवजी खास सेक्स डॉल्स घरात ठेवल्या जातत.