अमेरिकेच्या पेनसिल्वेनियामध्ये राहणारी २३ वर्षीय शॉनॉन कीलर आपल्या बॉयफ्रेन्डसोबत सुट्टी एन्जॉय करत होती. सर्व त्रास, चिंता विसरून दूर असलेली शॉनॉन बऱ्याच महिन्यांनी तिचं फेसबुक ओपन करते. त्यावर आलेला एक मेसेज ती वाचते आणि अचानक घाबरते. कारण तिने अशा मेसेजची कल्पना स्वप्नातही केली नसेल.
शॉनॉनने मेसेजमध्ये असं काय वाटलं होतं की, तिला धक्का बसला, ती घाबरली. तर हा मेसेज होता तिच्यावर रेप करणाऱ्या नराधमाचा. त्याने शॉनॉनला मेसेज करून लिहिलं होतं की, 'मी तुझ्यावर रेप केला होता. जर तुझ्याकडे वेळ असेल तर मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. मला तुझ्यासाठी प्रार्थना करायची आहे'.
मेसेज वाचल्यावर शॉनॉनच्या लक्षात आलं की, तो तोच आरोपी आहे ज्याने २०१३ मध्ये तिचा एका पार्टीतून पाठलाग केला होता. तो तिच्या हॉटेलपर्यंत तिच्या मागे देला आणि तिच्यावर रेप केला. अचानक आठ वर्षांनी सोशल मीडियावरून त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. रेपच्या घटनेनंतर कीलरने पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. पण पोलिसांकडून तिला जास्त मदत मिळाली नाही आणि बरेच वर्ष ती या वेदनेसह जगत राहिली.
आरोपीच्या फेसबुकवर आलेल्या या मेसेजच्या माध्यमातून शॉनॉनला आशा आहे की तिला न्याय मिळेल. यासाठी ती वकिलांना भेटली आणि कायदशीर कारवाईची चर्चा केली. शॉनॉन म्हणाली की, ती ही लढाई लढणार आणि आरोपीला तुरूंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही.
शॉनॉनने सांगितलं की, गेल्यावर्षी पोलिसांनी तिची केस फाइल बंद केली होती. अमेरिकेसारख्या देशात रेपच्या खूप समोर येतात. हा एक अशा गुन्हा आहे ज्यामुळे महिलांना फारच त्रासातून जावं लागतं. मला आशा आहे की, यावेळी मला नक्की न्याय मिळेल.