संघर्ष : युक्रेनचे सैनिक रशियात घुसले, १०० ठार; पुतिन म्हणाले ही तर चिथावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 07:53 AM2024-08-09T07:53:40+5:302024-08-09T07:54:00+5:30
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी या घुसखोरीचे वर्णन “मोठ्या प्रमाणावर चिथावणी” असे केले आहे.
किव्ह : युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनचे सैन्य घुसले असून, या भागात मोठी लढाई सुरू असल्याची माहिती रशियाच्या एका उच्च अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
कुर्स्कचे डेप्युटी गव्हर्नर आंद्रेई बेलोस्तोत्स्की म्हणाले की, रशियन सैन्य युक्रेनच्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी धडपड करत आहे. शत्रू एक इंचही पुढे सरकलेला नाही, याउलट ते माघार घेत आहेत. शत्रूची उपकरणे आणि शस्त्रे नष्ट केली जात आहेत. युक्रेनचे १०० सैनिक ठार झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी या घुसखोरीचे वर्णन “मोठ्या प्रमाणावर चिथावणी” असे केले आहे.
अंदाधुंद गोळीबार
- पुतिन यांनी निवासी इमारती, रुग्णवाहिका यांच्यावर विविध प्रकारच्या शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार झाल्याचा दावा करत उच्च संरक्षण आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसह बैठक घेतली आहे.
- त्यांनी मंत्रिमंडळाला कुर्स्क प्रदेशात मदत पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे युद्ध संघर्षात वाढ होण्याची भीती आहे. मॉस्कोपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर हा संघर्ष सुरू आहे.