न्यूयॉर्क/नवी दिल्ली : भारतात युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी संपर्क म्हणजेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट निरपेक्षता एकत्र नांदू शकतात, असे प्रतिपादन फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने केले आहे. झीरो रेटिंग प्लॅनमुळे भारतात इंटरनेट निरपेक्षता धोक्यात आल्याची टीका होत असताना झुकेरबर्गचे वक्तव्य आले आहे. झीरो रेटिंगवरील टीकेबाबत त्याने असहमती दर्शविली. त्याने म्हटले की, फेसबुकच्या नेतृत्वाखालील इंटरनेट डॉट ओआरजीला भारतासह अनेक देशांत मोफत इंटरनेट सेवा देण्याची अनुमती आहे. आम्हाला या प्रगतीवर अभिमान आहे. काही लोक झीरो रेटिंगच्या अवधारणेवर टीका करीत आहेत. निवडक सेवा मोफत दिल्याने नेट निरपेक्षता धोक्यात येईल, असे त्यांना वाटते. तथापि, या युक्तिवादाशी मी सहमत नाही.दरम्यान इंटरनेट नि:पक्षपातीपणाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादात अडकलेल्या भारती एअरटेलने आमच्या टोल फ्री प्लॅटफॉर्मवर असतील किंवा नसतील तरीही सगळ्या वेबसाईटस् आणि अॅप्लिकेशन्सशी आमची वागणूक दुजाभावाची असणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात सादर झालेल्या एअरटेल- झीरो या खुल्या बाजारात ग्राहकांना काही मोबाईल अॅप्स विनामूल्य उपलब्ध असतात व त्यांचा खर्च अॅप्स बनविणारी कंपनी सोसते. इंटरनेटच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारती एअरटेलवर सोशल मीडियातून जोरदार हल्ला करण्यात आला होता. ४भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत व दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे. ४विठ्ठल यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत आपल्याला एअरटेल झीरोवर खूप चर्चा बघायला मिळाली. या चर्चेचे स्वरूप असे आहे की जणू आम्ही इंटरनेट नि:पक्षपाती धोरणाचे उल्लंघन करीत आहोत. सोशल मीडियातून काही गटांतून पाठविण्यात येत असलेल्या सूचनांची आम्हाला काळजी आहे. आम्ही पूर्णपणे इंटरनेट नि:पक्षपातीपणाच्या बाजूने आहोत. ४एअरटेल झीरो माध्यम सगळे अॅप्स डेव्हलपर्स, कंटेट प्रदाता आणि इंटरनेट साईटस्साठी समान पद्धतीने उपलब्ध आहे व सगळ्यांना एकसारखे दर लागू असल्याचे मी यानिमित्ताने स्पष्ट करू इच्छितो, असे गोपाळ विठ्ठल यांनी त्यात म्हटले.
कनेक्टिव्हिटी, नेट निरपेक्षता राहू शकतात एकत्र
By admin | Published: April 18, 2015 12:05 AM