वॉशिंग्टन : कानाला सतत लावलेले इअरबड्स किंवा हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, खूप गोंगाट असलेल्या संगीत कार्यक्रमांना aहजेरी लावणे या गोष्टींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुले व युवकांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे असे एका पाहणी अहवालात म्हटले आहे. बीएमआय ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात या अहवालावर आधारित लेख प्रसिद्ध झाला आहे. ही आरोग्यविषयक गंभीर समस्या असून, तिच्या नियंत्रणासाठी ठोस धोरणे आखण्याची गरज आहे.
आनंद मिळेल, मात्र...nबीएमआय ग्लोबल हेल्थ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये १२ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले, युवकांचा समावेश होता.nगाणी किंवा कार्यक्रम ऐकल्याने मनाला आनंद मिळतो. मात्र, मोठ्या आवाजात सतत गोष्टी ऐकत राहिले तर त्याचा श्रवणशक्तीवर परिणाम होतो. nत्यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पण, या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, हे चुकीचे असल्याचे या पाहणीच्या अहवालात म्हटले आहे.
आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, युवावर्ग स्मार्टफोन, हेडफोन, इअरबड्स अशा गोष्टींचा सातत्याने वापर करतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. या गोष्टींमुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.हेडफोन, इअरबड्स वापरणारे ध्वनीची पातळी १०५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवून कार्यक्रम, गाणी ऐकतात. संगीत कार्यक्रमात ध्वनीची पातळी १०४ ते ११२ डेसिबलच्या दरम्यान असते. प्रौढ व्यक्तींनी ८० डेसिबल व लहान मुलांनी ७५ डेसिबल इतकी ध्वनीची पातळी राखून कार्यक्रम काही काळच ऐकले पाहिजेत.