रशियन शास्त्रज्ञांना १९७१ मध्ये येथे नैसर्गिक वायूचा साठा सापडला होता. यंत्रसामुग्रीद्वारे जमिनीला छिद्र पाडल्यानंतर वायू त्यांच्या हाती लागला. त्यांनी वायू साठवणे सुरूही केले. मात्र, अचानक त्यांनी छिद्र पाडलेल्या ठिकाणी जमीन खचून अवाढव्य विवर तयार झाले. खोदकामासाठी वापरलेली यंत्रसामुग्री विवरात गडप झाली. या विवरातून विषारी वायू निघत असल्याने शास्त्रज्ञांनी तेथे आग लावण्याचा निर्णय घेतला. आगीने हा वायू जळून काही आठवड्यात नष्ट होईल आणि हे संकट एकदाचे टळेल, असा त्यांचा होरा होता. मात्र, त्यांचा हा अंदाज चुकला. आज याला ४० वर्षे लोटली असून हे विवर आजही तसेच धुमसत आहे. तुर्की भूमीच्या उदरात दडलेल्या प्रचंड वायूसाठ्याचे निदर्शक म्हणून या विवराकडे पाहिले जाते.
सतत धुमसणारी आग, उकळता चिखल : शास्त्रज्ञांच्या चुकीमुळे झालेले ‘नरकाचे प्रवेशद्वार’
By admin | Published: June 11, 2014 11:18 PM