पर्थ - मुसलमानांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे हराम आहे, असे एका वादग्रस्त इमामांनी म्हटले आहे. सुफयान खलीफा नावाच्या इमामांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फॉलोअर्सना लस न टोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या मुस्लीम संघटना लशीचे समर्थन करत आहेत त्यांच्यावरही त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, इतरही काही धार्मिक नेत्यांनी ऑक्सफर्डच्या लशीला विरोध केला आहे. कारण ही लस एका अॅबॉर्टेड बेबीच्या सेलपासून तयार करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने नुकताच ऑक्सफर्ड लशीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. तर, सुफयान खलीफा नामक इमामांनी म्हटले आहे, 'अशा मुस्लीम संस्थांची लाज वाटते, ज्या लशीचा वापर योग्य असल्याचे ठरवत आहेत.' इमामांनी म्हटले आहे, की कॅथोलिक ख्रिश्चनदेखील या लशीला विरोध करत आहेत, कारण हे हराम आहे. बे कायदेशीर आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका ख्रिश्चन धर्मगुरूंनीही ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला विरोध केला होता. मात्र, इतर धार्मिक नेत्यांनी लशीच्या वापराचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल इमाम काउंसिलचे प्रवक्ता बिलाल रऊफ म्हणाले, इस्लामचा सर्वात मोठा सिद्धांत जीव वाचवणे हा आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण