Rafael Deal Controversy: तेव्हा सत्तेत नव्हतो, मात्र हा दोन्ही देशातील करार - इमॅन्युएल मॅक्रॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 05:53 PM2018-09-26T17:53:01+5:302018-09-26T18:00:37+5:30
Rafael Deal Controversy: राफेल डील प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे.
न्यूयॉर्क : राफेल डील प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राफेल डील प्रकरणाच्या वादावर थेट बोलणे टाळले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, राफेल डीलचा करार दोन देशांमध्ये झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे म्हटले आहे, त्याचाच मी संदर्भ देत आहे. त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो. मात्र, मला माहीत आहे की,आमचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत.
#WATCH French President Emmanuel Macron on Rafale deal, says, "It was a govt to govt discussion. I just want to refer to what PM Modi very clearly said a few days ago. I was not in-charge at that time. I know that we have very clear rules." (25.09.18) pic.twitter.com/qr0GgHsdoU
— ANI (@ANI) September 26, 2018
देशात सध्या राफेल डीलवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर राफेलचे कंत्राट जाणीवपूर्वक अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या व्यवहारात 30 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा काँग्रेससह विरोधकांनी केला आहे. तसेच राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी तर, मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका केली आहे.
French President Emmanuel Macron said that he was not in power when the controversial Rafale fighter jets deal was signed between India and France
— ANI Digital (@ani_digital) September 26, 2018
Read @ANI Story | https://t.co/aNJpLFr1UQpic.twitter.com/BEyz2HN1F4