न्यूयॉर्क : राफेल डील प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राफेल डील प्रकरणाच्या वादावर थेट बोलणे टाळले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, राफेल डीलचा करार दोन देशांमध्ये झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे म्हटले आहे, त्याचाच मी संदर्भ देत आहे. त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो. मात्र, मला माहीत आहे की,आमचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत.