क्वालालंपूर - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य पोहचवणारा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकला मलेशिया हिंदुस्थानकडे सोपवणार नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महातीर बिन मोहम्मद यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे झाकीर नाईक भारतात परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
झाकीर नाईक याला मलेशियात नुकतीच अटक करण्यात आली असून मलेशिया सरकार त्याला भारताकडे सोपविणार असल्याची बातमी पसरली होती. मात्र, मलेशियाच्या पंतप्रधानांनी झाकीरच्या प्रत्यार्पण करणार नसल्याचे सांगितले आहे. झाकीर नाईकला आम्ही मलेशियाचे नागरिकत्त्व दिलेले आहे. त्यामुळे आम्ही त्याला भारताकडे सोपविणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, नाईकविरुद्ध भारतात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अनेक गुन्हे नोंदवले आहेत.