कोरोना व्हायरसच्या (Corona Virus in America) उच्छादामुळे अनेक देशांनी गेले दीड वर्ष शाळा. कॉलेज बंद ठेवल्या होत्या. परंतू भारतातील काही राज्यांसह अमेरिकेसारख्या देशांनी लहान मुलांच्या शाळा सुरु केल्या असून त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अमेरिकेत शाळा सुरु होताच कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत अडीज लाखांहून अधिक मुले कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive children's) झाले आहेत. तर एक महिन्यात संक्रमित होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या साडे सात लाखांवर पोहोचली आहे. यामुळे अमेरिकेचे हेल्थ एक्सपर्टने यावर चिंता व्यक्त केली आहे. (Children hospitalized with COVID-19 in America hits record number after school opening.)
अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात ही माहिती दिली आहे. यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 2.5 लाखांहून अधिक मुले कोरोनाग्रस्त झाली आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजवरच्या बाल उपचार संख्येतील हा उच्चांकी आकडा असल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच दोन आठवड्यांत 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या काळात अमेरिकेत 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ असा चार रुग्णांमागे एक मूल कोरोना पॉझिटिव्ह होते.
मुलांमध्ये कोरोना सापडू लागल्याने आता लहान मुलांच्या हॉस्पिटलवर दबाव वाढू लागला आहे. यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एँड प्रिवेंशनच्या आकड्यांनुसार 6 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात जवळपास 2500 मुलांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा आकडा आधीपेक्षा जास्त आहे. 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या काळात साडे सात लाख मुलांना कोरोनाची बाधा झाली.
आजवर कोरोनामुळे अमेरिकेत 50 लाखांहून अधिक मुलांना बाधा झालेली आहे. तर 444 मुलांचा मृत्यू झाला आहे. सीडीसीने डेल्टा व्हेरिअंटमुळे मुलांना कोरोना होत असल्याचे म्हटले आहे. जून ते ऑगस्ट काळात चार वर्षांपेक्षा कमी वय आणि 12 ते 17 वर्षांच्या मुलांची हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची संख्या ही 10 पटींनी अधिक होती. यामध्ये लसीकरण न झालेली मुले अधिक होती.