Corona in China: जगात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असतील, पण चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय रोवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे तेथील सरकारकडून झिरो कोव्हिड पॉलिसीअंतर्गत निर्बंध आणि लॉकडाऊन लादले जात आहेत. झेंगझोऊ शहरातही हीच परिस्थिती आहे, ज्यामुळे अॅपलच्या कारखान्यातून कर्मचारी पळून जात आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कर्मचाऱ्यांचे पलायन
चीनची कोव्हिड झिरो पॉलिसीब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या कोव्हिड झिरो पॉलिसीअंतर्गत जिथे-जिथे कोरोनाचे नवीन प्रकरण समोर येत आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. या धोरणांतर्गत मोठी लोकसंख्या असलेल्या झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फॉक्सकॉनचा हा प्लांट बाधित जिल्ह्याच्या जवळ आहे. अशा स्थितीत प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच कोरोनाच्या निर्बंधांना सामोरे गेलेले लोक पुन्हा निर्बंध टाळण्यासाठी तेथून पळ काढत आहेत.